Saturday, 11 September 2021

शाळेचा मुख्याध्यापक पदाचा चार्ज देवाण घेवाण करताना अथवा घेताना घ्यावयाची दक्षता.

 

शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा पदभार देवाण घेवाण यादी*

    आपण ज्या शाळेत काम करत असाल अशा कार्यालयातून आपली  दुसऱ्या शाळेत बदली झाली असेल अशा वेळी आपणास चार्ज  द्यावा अथवा घ्यावा लागतो. चार्ज देताना  अथवा घेताना कोणत्या बाबीची नोंद केली पाहिजे अथवा चार्ज देताना कोणत्या गोष्टीचा चार्ज दिला पाहिजे किंवा चार्ज घेताना  कोण कोणत्या गोष्टीचा चार्ज घेतला पाहिजे. याविषयी आपणास माहिती नसते. आपली प्रशासकीय बदली असो अथवा विनंती बदली असो आपणास नवीन ठिकाणी जाण्या अगोदर चार्ज द्यावा अथवा घ्यावा लागतो. चार्ज देत असताना अथवा घेत अथवा असताना विविध बाबींची खात्री करून प्रशासकीय बाबी पूर्ण कराव्या लागतात. अशा गोष्टी कोणत्या आहेत. याविषयी आपणास कल्पना असणे आवश्यक असते.

       आपण चार्ज देत असाल तर आपल्या कार्यालयातील सर्व महत्त्वाची कागदपत्रे, फाईल वस्तू तसेच इतर आवश्यक बाबींचा उल्लेख करावा लागतो. जेणे करून आपली बदली झाल्यानंतर अथवा आपण कार्यालय सोडून गेल्यानंतर आपणावर कोणतीही कार्यवाही अथवा तक्रार केली जाणार नाही. तसेच चार्ज घेत असताना आपण ज्या महत्त्वाच्या गोष्टीचा चार्ज  घेत आहोत त्या सर्व गोष्टी मग त्या फाईल असतील, कागदपत्रे असतील अथवा शाळेतील विविध वस्तू असतील त्या यादीप्रमाणे रजिस्टर प्रमाणे आहेत का याची खात्री करावी लागते. जसे चार्ज यादीमध्ये दिलेले आहे अगदी त्याप्रमाणे व त्या स्थिती आहेत का याची पडताळणी करावी लागतो.

मुख्याध्यापक पदभार देवाण घेवाण महत्त्वाचे 

    चार्ज देवाण घेवाण करत असताना आपण जी यादी बनवत आहोत त्यामध्ये साधारणपणे खालील बाबींचा उल्लेख असणे आवश्यक असते १) चार्ज देणारा व चार्ज घेणारा यांची नावे. २) चार्ज दिल्याची व घेतल्याची तारीख ३) चार्ज कोणाच्या समक्ष घेतला असेल तर त्याचे नाव ४) चार्ज यादी व यादीवरील स्वाक्षरी ५) बांधकाम अथवा इतर कोणते काम चालू असेल तर त्यांची नोंद करावी. ६) कार्यालयीन खाते बुक ७) बँक पास बुक व त्यामधील शिल्लक रक्कम ८) साहित्याचे नाव व त्याची संख्या ९) कांही अपूर्ण असेल तर त्याची नोंद १०) बदली अथवा कोणत्या कारणामुळे चार्ज देत आहात किंवा घेत आहात तो आदेश या सर्व बाबींची माहितीची नोंद करणे आवश्यक असतो.

मुख्याध्यापक पदभार घेताना खालील यादी प्रमाणे घ्यावा-

https://drive.google.com/file/d/1CnuBJxRemGWqTmCS54COxUTobo9zllmc/view?usp=drivesdk 

या LINK वर CLICK केल्यावर तुम्हाला PDF मध्ये पदभार देवाण-घेवाण यादी प्रत मिळेल.

धन्यवाद शिक्षक बंधू-भगिनींनो !!!



No comments:

Post a Comment