Thursday, 5 June 2025

शिवराज्याभिषेक

 💥 *6 जून - शिवराज्याभिषेक सोहळा विशेष संपूर्ण माहिती वाचा.*

💥 *6 जून - शिवराज्याभिषेक सोहळा विशेष संपूर्ण माहिती वाचा.*


🎯 *किल्ले रायगडावर ६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजी महाराज यांनी गागाभट्ट यांच्याकडून आपला राज्याभिषेक करवून घेतला. राज्याभिषेक सोहळा साठी त्यांनी ३२ मण सोन्याचे सिंहासन बनवुन घेतले. एक मोठा भव्यदिव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. रयतेला राजा मिळाला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. रायरीचे नाव रायगड असे बदलले. अनेक देशी विदेशी राजे सरदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.*

🎯 *किल्ले रायगडावर ६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजी महाराज यांनी गागाभट्ट यांच्याकडून आपला राज्याभिषेक करवून घेतला. राज्याभिषेक सोहळा साठी त्यांनी ३२ मण सोन्याचे सिंहासन बनवुन घेतले. एक मोठा भव्यदिव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. रयतेला राजा मिळाला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. रायरीचे नाव रायगड असे बदलले. अनेक देशी विदेशी राजे सरदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.*

Friday, 12 July 2024

माझे सोलापूर

 सोलापुर बद्दल माहिती : 


शांतिसागर मंगल कार्यालयाखाली खुप मोठी बांधीव विहीर आहे ... त्यावर मंगल कार्यालय बांधलं गेलं 

अशीच गंगा विहीर नवी पेठेतली ... त्यावर फॅशन साडी बांधलंय 

गंगा विहीर अजुन आहे 

खारी बावडी

पंखा विहीर

साखर विहीर ... साखरपेठेतली विस्मरणात जात आहेत


सावरकर जलतरण तलाव ...

युज्वली टँक बांधताना जमिनीत खड्डा घेतात

साठच्या दशकात सुभाष बुबणे म्हणुन सिटी इंजिनिअर होते सोलापुरात 

पार्क मैदानाला कामगार मैदान असं म्हणायचे

तेव्हा सोलापुर गिरणगाव होतं

संध्याकाळी गिरण्या सुटल्यावर कामगार लोक या मैदानावर टाईमपास ला यायचे

चार पुतळा ते पार्क चौकाकडुन उतार होता तो सिद्धेश्वर तळ्यापर्यन्त

बुबणे सरांना कल्पना सुचली

त्यांनी तलावाच्या शेजारील खंदकाची भिंत काटकोनात वाढवली जुन्या महीला समाज पर्यन्त ... जिथं आता स्टेप पार्किंग आहे सिद्धेश्वर प्रशालेचं ...

या उताराला आता बंदिस्त केल्यानं खड्ड्याचं स्वरुप आलं

या खड्यात रेक्लमेन्शन केलं ...

हे रेक्लमेन्शन करताना स्वीमींग टँकची जागा रीकामी सोडुन भराई केली व आत आर सी सी पडदी करुन टँक बांधला ...

अशा प्रकारे बांधलेला हा जगातला माहीती असलेला एकमेव स्वीमींग पुल आहे ...

साठच्या दशकात अडीचशे रुपयात लाईफ मेम्बरशीप होती

माझ्या आत्याचे यजमान श्री राघवेन्द्रराव बदामिकर तेव्हाचे लाईफ मेम्बर

बुबणे रोटरी नाॅर्थ चे चार्टर मेम्बर व पास्ट प्रेसिडेंट नन्तर मेसन्स क्लबला पण सदस्य झाले ... मेसनचे बहुतेक स्काॅटीश लाॅजचे वाॅर मास्टर होते


नाॅर्थकोटची इमारत देखील अशीच दीड दोनशे वर्षे जुनी ...

त्या काळात मुम्बई च्या खालोखाल सोलापुरात उत्तम तंत्रशाळा होती.

इथुन पास होणाऱ्यांना हमखास  व्हीजेटीआय ला इंजिनीअरिंग पदवीकेला प्रवेश मिळायचा.


भारतात सुरुवातीला इंजिनीअरिंगचा डीप्लोमा सुरु झाला 

मग डीग्री सुरु झाली 

तेव्हा बीई नव्हतं ... बीएससी इंजिनीअरिंग होतं ... मग बीई आणि स्वातंत्र्योत्तर काळात बीटेक सुरु झालं

 सोलापुरात अतिशय अप्रतिम अशी जैन मन्दीरे देखील आहे 


आजोबा गणपती शेजारील जैन मंदीर ... बुबणे जैन मंदीर चाटी गल्ली

अप्रतिम घडाई

दगड असा घडवलाय जणु सी एन सी मिलींग मशीनने घडवलाय

जोड असे सांधलेत की कळुनच येत नाहीत 

अप्रतिम वास्तुशिल्प

 कदाचित ...

दगडी घडीव बांधकाम असलेल्या जगातील सर्वात मोठ्या विहीरी  सोलापुरात आहेत ...

माहीती मिळवतोय ...

परवा हरीभाई समोर रस्ता खोदलाय ना तिथं एक दगडी भुयार सापडलंय


असंच एक भुयार लकी रेस्टॉरंट च्या खाली सापडलं होतं


त्यावर आता मोठी ईमारत आहे 


खारी बावडीत विहीरीत भुयार असुन तिथं अडुसष्ठ लिंगापैकी एक लिंग आहे.

 गांधी प्राणिसंग्रहालयाच्या शेजारी ब्रीटीशकालीन सिमेट्री आहे

अनेक इंग्रजांना तिथे दफन केलं गेलंय

तिथं एक चॅपेल आहे

दगडी बांधकाम आहे

त्या दगडाला ... बॅसाल्टला जो गुळगुळीत फिनीश दिलाय तो पाहण्यासारखा आहे 

गाॅथीक शैलीतलं बांधकाम 

तसंच एक मोठं चर्च सेटलमेंटमधे आहे 

परवा गाडी ट्रान्स्फर करुन आरटीओ कडुन येताना मुद्दाम वाट वाकडी करुन सेटलमेन्टमधुन आलो तेव्हा ते भव्य चर्च दिसलंच नाही

आजुबाजुला आताशा बरीच बांधकामे झाली आहेत.


सोलापूरच्या रिपन हाॅल मध्ये 1948 च्या आधी एकदा नथुराम गोडसेंचं व्याख्यान सुध्दा झालं होतं.


रेवणी मारुती ...


रेवणी हा भुईकोट दुर्गाचा अविभाज्य घटक असतो.


जमिनीवरील दुर्ग ज्याच्या चार मुख्य दिशा व चार उपदिशांना खंदक किंवा नैसर्गिक किंवा  कृत्रिम जलाशय बनवुन दुर्गाला द्वीपसदृश प्रारुप दिले गेलेले असते त्या प्रारुपात दुर्गाची तटबन्दी संपल्यावर जो खन्दक असतो त्या खन्दकाची बाहेरील संरक्षक तटबंदी म्हणजे रेवणी.


ग्रामाच्या वेशीवर संरक्षक देवतांची मन्दीरे असतात.

उदाहरणार्थ 

हनुमन्त काळभैरव वगैरे वगैरे 

तसेच या वेशीवर *विरगळ* देखील असतात.


सोलापुरात अनेक वेस आहेत...


विजयपुर वेस 

काळजापुर वेस

कुम्भार वेस

बाळीवेस 

पाणीवेस ... 

तशीच रेवणी वेस देखील आहे ...

या रेवणी वेशीवरचा तो रेवणी मारुती ...


तिथे आसपास उत्खनन केल्यास विरगळ देखील सापडतील हा माझा कयास आहे.


विरगळ सदृष भित्तीशिल्पाचे भग्नावशेष रेवणी मारुतीच्या शेजारील आडोशाला ठेवलेले दिसुन येतात.


रेवणी हा एकोणीसशे वीसच्या दशकात गावाबाहेरील भाग होता.


डासांची उत्पत्ती कमी करण्याच्या अनुषंगाने ब्रिटिशांनी सोलापुर भुईकोटाच्या ऐतिहासिक व नैसर्गिक परीदृष्याची वाताहत केली अन खंदक बुजवला.


या बुजवलेल्या खंदकावर जिथे सद्ध्या हुतात्मा उद्यान आहे तिथे सर्कशीचे तम्बु लागायचे.

गावाची लोकसंख्या वाढल्यावर नवीन भुखंड या रेवणीला समान्तर असे आखले गेले ती म्हणजे आजची गोल्डफिन्च पेठ किल्ला रोड.

ही विकासकामे तत्कालीन गोल्डफिन्च नामक जिल्ल्हाधिकाऱ्याने केली त्यावरुन या पेठेचे नाव नवी पेठ असे रुढ झाले.


ऐतिहासिक सोलापुर 

सन्दर्भ संकलक निमिष कुलकर्णी

 बहुतेक ते हाॅटेल बाळींचं होतं

बाळी एके काळचे पुर्व भागाचे नगरशेठ

शंभर साळी बरोबर एक बाळी अशी म्हण होती पुर्वभागात

कितीपण चादरी बेडशिट टाॅवेल सतरंज्या बनवा आणी बाळींकडं घेउन या ...

बाळी कुणालाही नाराज करायचे नाहीत 

आणलेला सगळा माल विकत घ्यायचे ...

जगभर सोलापुरचा माल विकायचे

सात रस्त्याची बाळी अपार्टमेंट सोलापुरातली पहीली अपार्टमेंट 

पन्नास साठच्या दशकात बाळींनी मुम्बई ला फ्लॅट पाहीला अन तसं घर असावं म्हणुन सात रस्त्याला दीड दोन डझन फ्लॅट असलेली अपार्टमेंट बांधली.

मोठं कुटुंब 

सगळ्या फ्लॅटमधे बाळीच रहायचे

भव्य अन प्रशस्त खोल्या

बाहेरुन अपार्टमेंट पण आतुन बंगला

फुटा सव्वा फुटाच्या भिंती आहेत

तेव्हा सोलापुरात आरसीसी फारसं नव्हतंच

बाळीच्या घरातल्या एका फॅमिली मेम्बरच्या नावे शंभर साळ्यांची (चादर कारखानदार) जेवढी प्राॅपर्टी असेल तितकी प्राॅपर्टी असायची म्हणुन 

सौ साळी बरोबर एक बाळी असं म्हणायचे

बाळींचं दुकान आहे अजुन नवी पेठेत ... मुळे बिल्डींग मधे

सात रस्त्यावरील फ्लॅटमधे बरीचशी सरकारी ऑफीसं आता भाड्यानं आहेत.


जमिनीखाली वेगळंच सोलापुर दडलंय

थरावर थर पडत गेले ... काळाचे व मातीचे

जुनं नजरेआड झालं

कधीतरी खोदकामात जुनं नव्यानं दिसतं अन काय काय घडलं असेल इथं ...

विस्मय वाटतो

वारदांचं सराफ कट्ट्यावरचं घर पाडुन तिथं काॅम्लेक्स झालं

सुंदर दगडी बांधकाम होतं

गरुड बंगल्याचा गरुड नाही आता

बागेवाडीकर दवाखाना अन इंद्रभवनाचे कारागिर एकच असल्याचा माझा निष्कर्ष खरा ठरला

पंखा विहीर दुर्लक्षित आहे

पंखा विहीरीजवळचा वालचंद शेठजींचा बंगला पाडला गेला ... इंडो इटालियन शैलीतलं बांधकाम होतं ...

कुमुदिनीबाई दोशी असताना मी अनेकदा त्या बंगल्यात गेलो होतो ...

काय वैभव होतं ...

एकरामधली प्राॅपर्टी ...

बंगल्याच्या मागं लाॅन टेनिसची दोन कोर्ट होती

एक ग्रास कोर्ट अन दुसरं क्ले कोर्ट

चिकुची बाग होती ...

ती बाग पंधेना विकली ...

चिक्कुची झाडं तोडुन त्यावर विद्याविहार अपार्टमेंट उभं राहीलं ...

माझा फ्लॅट आहे तिथं ...

सर्च काढताना खुप गोष्टी कळल्या ...

शहाण्णव साली मी सत्तर वर्षाचे रेकाॅर्ड काढले होते

पंखा विहीर खुप प्रसिद्ध होती

तिथं एक छापखाना होता ... जैन धर्मीय साहीत्य छापलं जायचं ...

शरयु दफ्तरी म्हणुन नावाची नोन्द मला सर्च मधे दिसली 

या शरयु दफ्तरी बहुतेक वालचंद शेठजींची नात असावी.

ब्रिजेश गांधी तृप्ती दोशी यांनी घरातील ज्येष्ठ लोकांना विचारलं तर सविस्तर माहीती मिळेल

आपल्या शाळेला ज्यांचं नावं दिलं गेलं ना ते *हरीभाई देवकर्ण* ... इंग्रजांनी देवकर्णचा देवकरण असा अपभ्रंश केला ...

आपण आजही देवकर्ण ऐवजी देवकरणंच असं उच्चारण करतो.


डफरीन चौकात पुणेकर कामटे शेजारी एक दोनशे वर्ष जुना दगडी कौलारु बंगला आहे ... किर्लोस्करान्चा ...

त्या बंगल्यात स्टेन ग्लासवर पेन्टींग आहेत ... खुपच छान

भिन्तीवर रंगकामात नक्षीकाम आहे ... पानाफुलांची बुट्टीदार डीजाईन आहेत 

या बंगल्यात एके काळी आनन्द स्टोअर्स म्हणुन प्रसिद्ध दुकान होतं ...

ते दुकान तृप्ती दोशीच्या आजोबांचं किंवा पणजोबांचं होतं

त्या बंगल्याच्या ट्रसेस ... किंग पोस्ट ... क्वीन पोस्ट  सागवानी आहेत ...

बहुतेक ते बर्मा टीक असावं ...

ते टीक अन इंद्रभवनाचं टीक एकाच लाॅटमधे आयात केलं गेलं असावं असा माझा कयास आहे 

इंद्रभवनाच्या गच्चीवर एका  बालकामगाराचे शिल्प आहे ... तो अभागी जिव इंद्रभवनाच्या गच्चीवरुन पडुन गतप्राण झाला होता.


तेराकमानीचा पाया शिसात आहे 

तिथं बांधकाम धरत नव्हतं

नव्या पुलाकरीता सत्तर पंचाहत्तर फुट खोल एन्ड बेअरींग पाईल घेतल्या गेल्या 

पुर्वी पाईलींग मशीन नसल्याने शिसं ओतुन बांधकाम केलं गेलं


सोलापुरात नवा जुना खजिना आहे ... वास्तुन्चा


मला त्या वास्तु खुणावतात ... माझ्याशी बोलतात

अनेकदा मी एकटक या जुन्या ईडीफिस बघत राहतो ...

बरोबर असलेल्यांना कळत नाही ... मी काय बघतोय ते


आज विषय निघाला म्हणुन टंकप्रपंच

किर्लोस्करांच्या बंगल्यात भरायची ती शाळा निराळी

हरीभाई इंद्रभवनात भरायची


वारदांच्या पेढीचा अन्त खुपच करुणाजनक रीतीने झाला


हरीभाई प्रथम जुन्या विठ्ठल मंदिरात आसपास सुरु झाली मग मुलांचा पट जसजसा वाढत गेला तशी स्थलान्तरे घडत गेली

अत्ताच्या दगडी इमारतीत स्थलान्तरण होण्याआधी इंद्रभवनाच्या इमारतीत भरायची


वारदांचं सरकारी देणं वसुल करण्यासाठी कोर्टानं लवाद नेमला होता

त्या लवादावर माझे आजोबा कै जगन्नाथ  एकनाथ कुलकर्णी यांची निवड झाली होती 

पुढे मग इंद्रभवनाचा लिलाव करण्यासाठी लिक्वीडेटर म्हणुनही आजोबांची निवड झाली 


बेलाटीकर पाटील आणी मनपा या दोघांनी शेवटच्या खरेदीच्या बोली लावल्या.

त्या काळात बेलाटीकर पाटील बैलगाडीतुन चार पोते सोनं चांदी पैसे वगैरे घेउन आजोबांच्या ऑफीसात आले होते.

पण मनपाची गरज मोठी होती

पाटलांच्या अनेक कज्ज्यात वखीलपत्र  माझ्या आजोबांकडेच होतं 

पाटील आजोबांच्या ऐकण्यातले होते म्हणुन तत्कालीन कलेक्टर व इतर उच्चपदस्थांच्या विनन्तीनुसार आजोबांनी पाटलांना शब्द टाकला अन पाटलांनी माघार घेतली व मनपा इंद्रभवनात आली.


रेवणीच्या पलीकडले बहुतेक प्लाॅट ब्रिटिशांनी आठ हजार ... दहा हजार स्क्वेअर फुटात आखले.


तिथं भव्या प्रासादतुल्य घरं बंगले उभे राहीले

उदाहरणार्थ 

सेठीया निवास म्हणजे पुर्वीचा जोशी निवास ... सेन्ट जोसेफ शेजारी ... या बंगल्याच्या आउटहाउसमधे नुमविच्या मंगलताई जोशी भाड्याने रहायच्या ... पुढे त्यांनी सोलापुर सोडलं अन बेळगावला गेल्या.

या बंगल्याशेजारीच मुळे बंगला आहे ... रावबहादुर मुळे ... म्हणजे आपल्या मुळे हाॅलचे देणगीदार ... भव्य कौलारु बांधकाम 

शेजारी डाॅक्टर वळसंगकरांचा बंगला ... तिथं आता काॅम्लेक्स झालं अन नर्मदा हाॅस्पीटल आहे ... पुढं शिदोरेंचा बंगला ... रस्ता ओलांडला की कनाळे काॅम्लेक्स ... कनाळे काॅम्लेक्स च्या आधी तिथं घाटगे पाटलांचं वर्कशॉप व ऑफीस होतं ... वर्कशॉप एवढं भव्य होतं म्हणतात की आत ट्रक रिव्हर्स न घेता गोल फिरवता यायचा ... पुढं गंगा निवास काडादींचा ... एकरामधला प्लाॅट

अत्ताचं धृव हाॅटेल असलेला जोशी बंगला ... हे जोशी डाॅक्टर होते ... त्यांनी तो बंगला डाॅक्टर राउतना विकला

ब्रिटिशांनी बराकी उभ्या राहतील अशा मापानं मोठ्या प्लाॅटचे लेआउट आखले.

सोलापुर सुंदर आहेच ... पण हे सौन्दर्य जपायला हवे...  


Techsbi

Wednesday, 29 September 2021

मी नास्तिक का आहे ?- शहीद भगतसिंग

 



आपली नास्तिकवादी भूमिका नेमकी काय आहे हे पटवून देण्यासाठी भगतसिंगने लाहोरच्या तुरुंगात असताना 'Why I am an Atheist' हा लेख लिहिला.

 क्रांतिकारकांचा शिरोमणी असलेला भगतसिंग (Bhagat Singh) हा आजही देशातील तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. भगतसिंगला एक वैचारिक बैठक होती, त्याची एक स्वतंत्र विचारधारा होती, हे त्याचे वैशिष्ट्य आणि हिच गोष्ट त्याला इतर क्रांतिकारकांपासून वेगळी बनवते. देशाला केवळ स्वातंत्र्य मिळवून द्यायचं नाही तर त्यानंतर देशात एका समाजवादी समाजरचना निर्माण करायची आणि त्या आधारे गरिबातल्या गरीब व्यक्तीला आधार द्यायचा हे त्याचे स्वप्न. भगतसिंगचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे नास्तिकवादी विचार. हा विचार त्याने अगदी अखेरच्या श्वासापर्यंत जपला. आपली नास्तिकवादी भूमिका नेमकी काय आहे हे पटवून देण्यासाठी त्याने लाहोरच्या तुरुंगात असताना 'Why I am an Atheist' म्हणजे 'मी नास्तिक का आहे' या नावाने एक लेख लिहिला. हा लेख 27 सप्टेंबर 1931 रोजी लाहोरच्या 'द पीपल' या वृत्तपत्रात छापून आला. 


भगतसिंगचा देवावर विश्वास नाही हे समजल्यावर त्याच्यासोबत लाहोरच्या तुरुंगात असलेल्या बाबा रणधीर सिंहांनी यामागे त्याचा अहंकार असल्याचं सांगितलं. मग भगतसिंगने आपल्या नास्तिकवादाच्या मागची भूमिका पटवून देण्यासाठी हा लेख लिहिला.
या लेखाच्या माध्यमातून भगतसिंगने देवाच्या अस्तित्वावर अनेक तर्कपूर्ण शंका उपस्थित केल्या. या विश्वाची निर्मिती, मनुष्याचा जन्म, त्याची ईश्वराबद्दलची कल्पना, मग त्यामुळे निर्माण होणारी त्याची दीनता, देवाच्या नावाने होणारे मनुष्याचे शोषण, अराजकता, वर्णभेद अशा अनेक गोष्टींचे भगतसिंगने विश्लेषण केलं आहे. भगतसिंगच्या एकूण साहित्यामधील त्याचा हा लेख मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिला आहे. 


भगतसिंगच्या 'मी नास्तिक का आहे' या लेखाचे भाषांतर...


"मी माझ्या अहंकारामुळे सर्वव्यापी आणि सर्वशक्तीमान ईश्वरावर विश्वास ठेवत नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मी ईश्वराच्या अस्तित्वाला नाकारतोय, माझ्या अहंकारामुळे हा अविश्वास निर्माण झाला आहे या निष्कर्षापर्यंत माझे मित्र पोहोचले आहेत. मीही मनुष्य आहे, आणि मनुष्याच्या दुर्बलतेच्या वरती माझी शक्ती आहे अशी शेखी मी मिरवत नाही. अहंकार माझ्या स्वभावाचे एक अंग असलं तरी माझ्यातही काही कमतरता आहेत. मी निरंकुश सत्तावादी आहे आणि माझे विचार मी इतर सरकाऱ्यांवर थोपतो अशी तक्रार अनेक कॉम्रेड करतात. मी हे नाकारत नाही आणि याला अहंकार म्हटलं जाऊ शकतं. पण असंही म्हटलं जाऊ शकतं की हे आपल्या मतावर असलेला विश्वास असू शकतो. अहंकार म्हणजे स्वत:बद्दल विनाकारण असलेला गर्व होय. मग हा अहंकार मला नास्तिकवादाकडे घेऊन जातोय का? 


माझी नास्तिकवादाची भूमिका ही आताची नाही. मी ज्यावेळी सामान्य तरुण होतो तेव्हापासून मी देवावर विश्वास ठेवणं बंद केलं होतं. मी कॉलेजमध्ये असताना खूप हुशार असा विद्यार्थी नव्हतो. त्यामुळे त्यावेळी अहंकाराच्या भावनेच्या आहारी जाण्याची संधीच मिळाली नाही. मी एक साधा लाजाळू मुलगा होतो, ज्याची भविष्याकडे पाहण्याची दृष्टी काहीशी निराशावादी होती. माझ्या वडिलांचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे आणि ते आर्य समाजी होते. त्यामुळे त्यांचा देवावर विश्वास होता. ते मला रोज देवाची प्रार्थना करण्यासाठी प्रोत्साहित करायचे. नंतरच्या काळात मी क्रांतिकारी नेत्यांच्या सहवासात आलो. देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका असतानाही ते त्याला नाकारण्याचं धाडस दाखवत नव्हते. काकोरी कटातील सर्व चारही शहीदांनी आपल्या जीवनातील शेवटचे क्षण भजन-कीर्तनामध्ये व्यस्त केलं. 


सुरुवातीच्या काळात मी रोमॅन्टिक आदर्शवादी क्रांतिकारक होतो, दुसऱ्याचे अनुकरण करणारा. आता स्वत:च्या खांद्यावर जबाबदारी पेलण्याची वेळ आली होती. आपल्या विचारांना तर्क देण्यासाठी वाचन करणं आवश्यक होतं, मी ते सुरु केलं. बुकानिन, मार्क्स, लेनिन, ट्रॉस्की यांना वाचायला सुरु केलं. या सर्वांना त्यांच्या देशात क्रांती यशस्वी केली होती आणि हे सर्वजण नास्तिक होते. 1926 च्या शेवटापर्यंत मला हे समजून चुकलं की सर्वशक्तीमान, परमात्मा या सर्व गोष्टी मान्य करणं म्हणजे मुर्खपणा आहे. त्यानंतर मी नास्तिक झालो. 


मे 1927 मध्ये मला काकोरी कटातील क्रांतीकारकांना तुरुंगातून सोडवण्याच्या कटाची आखणी करत असल्याच्या आरोपाखाली अटक झाली. त्या एक महिन्याच्या काळात जेलमधील पोलीस अधिकारी मला रोज देवाची प्रार्थना करायला सांगायचा, पण मी नास्तिक होतो. चांगल्या आणि शांतीच्या काळात मी नास्तिक असल्याचं नाटक करतोय आणि अशा अडचणीच्या वेळी मी तो विचार सोडून देतोय का याची ती परीक्षा होती. 


या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर देवावर विश्वास ठेऊन पुढं जाणं हे माझ्या हातून होणार नाही हे निश्चित झालं. देवावरची श्रद्धा ही संकटाची आणि कष्टाची तीव्रता कमी करते. वादळ आणि तुफान येत असताना त्या विरोधात स्वत:चे पाय रोवून उभं राहणं हा काही पोरखेळ नाही. अशा कसोटीच्या क्षणी अहंकार, गर्व असेल तर त्याचं हरण होतं. 


निर्णय स्पष्ट आहे, एकाच आठवड्यात हे जाहीर होईल की मी माझं जीवन एका ध्येयासाठी त्याग करत आहे. एखादा हिंदू आपल्याला पुढच्या जन्मी राजाचा जन्म लाभावा किंवा मुस्लिम आणि ख्रिश्चन त्याला स्वर्गातील सुख मिळावं म्हणून प्रार्थना करत असेल. पण मग मी काय करु? पण मला याची कल्पना आहे की ज्या क्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल तो क्षण माझ्या आयुष्यातील शेवटचा क्षण असेल. माझ्या आत्म्याचा तिथे अंत होईल, त्यापुढे काहीच नाही. विना कोणताही पुरस्कार किंवा अपेक्षा न बाळगता मी माझ्या देशासाठी जीवन समर्पित करत आहे. स्वत: वर विश्वास ठेवण्याच्या गुणाला नेहमी अहंकाराची संज्ञा दिली जाते आणि हे दु:खद आहे. 


पूर्वजांनी मनात ठासवलेल्या परमात्माच्या अस्तित्वाला जर कोणी आव्हान देत असेल तर त्याला धर्मविरोधी आणि अहंकारी म्हटलं जातं. पण मला नास्तिकवादाकडे घेऊन जाणारा माझा अहंकार नव्हता. 


केवळ विश्वास आणि अंधविश्वास हा धोकादायक आहे. तो मनुष्याला प्रतिक्रियावादी बनवतो. प्रचलित मतं ही तर्क-वितर्काच्या कसोटीवर आणि सत्यतेच्या आधारावर पडताळली पाहिजेत. जर तुमचा असा विश्वास असेल की निर्मात्याने ही सृष्टी बनवली तर त्याने ती का बनवली याचं उत्तर द्या. हे जग दु:खानं भरलं आहे, अनेकांना कष्टप्राय जीवन जगावं लागतंय. यावर आता असं म्हणू नका की हा निर्मात्याचा नियम आहे. जर तसं असेल तर तो सर्वशक्तीमान नाही. तो आपल्याप्रमाणेच नियमांचा गुलाम आहे. असंही म्हणू नका की हे निर्मात्यासाठी मनोरंजन आहे. निरोने आपल्या मनोरंजनासाठी केवळ एक रोम जाळलं होतं. चंगेज खानने त्याच्या आनंदासाठी हजारोंची हत्या केली होती. लोक त्यांना काय संबोधतात. मग देव यांच्यापेक्षा निर्दयी आहे का? की हे सर्व कष्ट करणाऱ्यांना सन्मान आणि चुका करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी होतंय? जर देवाने मनुष्याची निर्मिती आनंद घेण्यासाठी केली असेल तर त्याच्यात आणि निरोमध्ये काय फरक राहिला? 


हिंदू धर्मात आजच्या कष्टासाठी गत जन्मातील पाप कारणीभूत असल्याचं सांगण्यात येतंय. मनुष्याने काही पाप केल्यास त्याला कुत्रा, मांजर, गाढव अशा प्राण्यांच्या जन्माला जावं लागतं. 84 लक्ष योनीतून प्रवास केल्यानंतर त्याला मनुष्याचा जन्म मिळतोय. पण आपल्यातील एक तरी मनुष्य असा आहे का जो सांगू शकतो की त्याच्या पापामुळे तो गेल्या जन्मात गाढव होता? आता यावर पुराणातील कथांचा आधार मला सांगू नका, माझ्याकडे पुराण कथांना कोणतंही स्थान नाही. 


एखादा मनुष्याला पाप करण्यापासून तो सर्वशक्तीमान देव का थांबवू शकत नाही? त्याने युद्धपिपासू राजांना का नाही थांबवलं? असं केलं असतं तर अनेक युद्धं झालीच नसती. भारतावर असलेली इंग्रजांची सत्ता ही ईश्वराच्या कृपेने नाही तर त्यांना विरोध करण्याची आपल्याकडे ताकत नसल्याने आहे. इंग्रजांची सत्ता ही बंदूक, रायफल्स, बॉम्ब, पोलीस आणि लष्कराच्या आधारावर आहे. त्या आधारे ते इथल्या लोकांचे शोषण करत आहेत. मग कुठे आहे देव? तो या सर्व गोष्टींचा आनंद घेतोय का? 


आपण संकटात असताना देवाच्या कल्पनेचा उपयोग होतो. जर यावेळी मनुष्य स्वत:च्या पायावर उभा राहिला तर तो यथार्थवादी बनेल. आपल्यासमोरील सर्व संकटांचा सामना धैर्याने आणि परुषार्थाने करणं आवश्यक आहे. आज हीच माझी स्थिती आहे. याला माझे मित्र अहंकार असं नाव देतात. ही माझी विचार करण्याची पद्धत आहे ज्याला नास्तिकवादी म्हणता येईल. देवाची रोज प्रार्थना करणे हा मनुष्याचा स्वार्थ आहे. ज्या लोकांनी संकटाच्या वेळी बहादुरीने त्याला तोंड दिलंय, मी त्या लोकांपैकी आहे. 


एका मित्राने मला म्हटलं की मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात देवाची प्रार्थना करेन. मी त्याला म्हणालो की, तसं नाही होणार. जर मी शेवटच्या क्षणी देवाचा धावा केला तर मी स्वार्थी आणि भ्रष्ट होईन. स्वार्थ साधण्यासाठी मी देवाची भक्ती नाही करणार. वाचकांनो, हा माझा अहंकार आहे का? तसं असेल तर तो मी स्वीकारतो."

Saturday, 11 September 2021

शाळेचा मुख्याध्यापक पदाचा चार्ज देवाण घेवाण करताना अथवा घेताना घ्यावयाची दक्षता.

 

शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा पदभार देवाण घेवाण यादी*

    आपण ज्या शाळेत काम करत असाल अशा कार्यालयातून आपली  दुसऱ्या शाळेत बदली झाली असेल अशा वेळी आपणास चार्ज  द्यावा अथवा घ्यावा लागतो. चार्ज देताना  अथवा घेताना कोणत्या बाबीची नोंद केली पाहिजे अथवा चार्ज देताना कोणत्या गोष्टीचा चार्ज दिला पाहिजे किंवा चार्ज घेताना  कोण कोणत्या गोष्टीचा चार्ज घेतला पाहिजे. याविषयी आपणास माहिती नसते. आपली प्रशासकीय बदली असो अथवा विनंती बदली असो आपणास नवीन ठिकाणी जाण्या अगोदर चार्ज द्यावा अथवा घ्यावा लागतो. चार्ज देत असताना अथवा घेत अथवा असताना विविध बाबींची खात्री करून प्रशासकीय बाबी पूर्ण कराव्या लागतात. अशा गोष्टी कोणत्या आहेत. याविषयी आपणास कल्पना असणे आवश्यक असते.

       आपण चार्ज देत असाल तर आपल्या कार्यालयातील सर्व महत्त्वाची कागदपत्रे, फाईल वस्तू तसेच इतर आवश्यक बाबींचा उल्लेख करावा लागतो. जेणे करून आपली बदली झाल्यानंतर अथवा आपण कार्यालय सोडून गेल्यानंतर आपणावर कोणतीही कार्यवाही अथवा तक्रार केली जाणार नाही. तसेच चार्ज घेत असताना आपण ज्या महत्त्वाच्या गोष्टीचा चार्ज  घेत आहोत त्या सर्व गोष्टी मग त्या फाईल असतील, कागदपत्रे असतील अथवा शाळेतील विविध वस्तू असतील त्या यादीप्रमाणे रजिस्टर प्रमाणे आहेत का याची खात्री करावी लागते. जसे चार्ज यादीमध्ये दिलेले आहे अगदी त्याप्रमाणे व त्या स्थिती आहेत का याची पडताळणी करावी लागतो.

मुख्याध्यापक पदभार देवाण घेवाण महत्त्वाचे 

    चार्ज देवाण घेवाण करत असताना आपण जी यादी बनवत आहोत त्यामध्ये साधारणपणे खालील बाबींचा उल्लेख असणे आवश्यक असते १) चार्ज देणारा व चार्ज घेणारा यांची नावे. २) चार्ज दिल्याची व घेतल्याची तारीख ३) चार्ज कोणाच्या समक्ष घेतला असेल तर त्याचे नाव ४) चार्ज यादी व यादीवरील स्वाक्षरी ५) बांधकाम अथवा इतर कोणते काम चालू असेल तर त्यांची नोंद करावी. ६) कार्यालयीन खाते बुक ७) बँक पास बुक व त्यामधील शिल्लक रक्कम ८) साहित्याचे नाव व त्याची संख्या ९) कांही अपूर्ण असेल तर त्याची नोंद १०) बदली अथवा कोणत्या कारणामुळे चार्ज देत आहात किंवा घेत आहात तो आदेश या सर्व बाबींची माहितीची नोंद करणे आवश्यक असतो.

मुख्याध्यापक पदभार घेताना खालील यादी प्रमाणे घ्यावा-

https://drive.google.com/file/d/1CnuBJxRemGWqTmCS54COxUTobo9zllmc/view?usp=drivesdk 

या LINK वर CLICK केल्यावर तुम्हाला PDF मध्ये पदभार देवाण-घेवाण यादी प्रत मिळेल.

धन्यवाद शिक्षक बंधू-भगिनींनो !!!



TOP EDUCATIONAL APPS

 

Top Education Apps on GOOGLE PLAY STORE 

O
Free AppsTOP PAID APPS
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
86
87
88
89
90
91
92
93
94
95
96
97
98
99
100